सावंतवाडी,दि.०३: गावठी वैद्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरडोंगरी गणेशनगर येथील लक्ष्मी उर्फ काशी नाईक वय ८५ यांचे नुकतेच निधन झाले.त्या काशी आत्या म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांच्यावर येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा सून नाती असा परिवार आहे सावंतवाडी नगर पालिका स्टॅण्डवरील रिक्षा चालक गुंडू नाईक यांच्या त्या मातोश्री होत.
नाईक या गावठी वैद्य म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांनी अनेकांना मुतखडा,गोवर कांजण्या अशा आजारातून गावठी औषध देवून बरे केले होते.
गेले काही दिवस त्या आजारी होत्या काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.