काजू बीला १७०/ रुपये हमीभाव मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन होणेबाबत दिले निवेदन.
सावंतवाडी,दि.०३ : गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी यांच्या समस्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ), शेतकरी व फळबागायतदार संघाने निवेदन सादर केले.
यात शिष्टमंडळाने पूर्वी काजूचा आयात दर हा तब्बल २० टक्के होता. तेव्हा स्थानिक काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव मिळत होता. मात्र आता तो दर केवळ अडीच टक्के एवढा झाल्यामुळे स्थानिक काजू उत्पादकांचा काजू कमी दराने घेतला जातो. त्यामुळे केंद्र शासनाने आयात ड्युटी वाढवावी, तशी शिफारस केंद्र स्तरावरून करण्यात यावी यासंदर्भात गोवा सरकारने योग्य ते सहकार्य करावे, अशी विनंती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब, तसेच काजू उत्पादक शेतकरी नेते विलास सावंत व तमाम काजू बागायतदार यांच्या शिष्टमंडळाने यावेळी निवेदनाद्वारे केली.
तसेच गोवा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांची शेतकरी आणि फळबागायतदार संघ सावंतवाडी व दोडामार्ग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह पर्वरी येथील मंत्रालयांमध्ये झालेल्या या नियोजित भेट दरम्यान काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या दृष्टीने कृषीमंत्र्यांचे मार्गदर्शन घेतले. गोवा राज्यामध्ये काजू बियाणाला प्रति किलो १५० रुपये असा भाव सध्या शेतकऱ्यांना देण्याची शासकीय योजना कृषी मंत्रालयामार्फत गोव्यात सुरू आहे. यापुढे जाऊन गोवा राज्य कृषी मंत्रालय प्रति किलो १७० भाव काजू उत्पादकाला मिळावा, यादृष्टीने प्रस्ताव आता होणाऱ्या गोवा राज्य अधिवेशनामध्ये मांडला जाईल व त्याला मंजुरी मिळेल, असे कळते. गोवा राज्यात एवढा चांगला दर काजू उत्पादकाला मिळत असेल तर मग महाराष्ट्रात तसाच दर मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे व मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबई येथे या अधिवेशनामध्ये भेट घेऊन काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे – परब, विलास सावंत अध्यक्ष सिंधुदुर्ग शेतकरी प्रोडूसर कंपनी ,दिवाकर म्हावळणकर, खजिनदार ,अशोक सावंत उपाध्यक्ष दोडामार्ग शेतकरी , आकाश नरसूले ,संजय देसाई अध्यक्ष दोडामार्ग शेतकरी संघ ,पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष सावंतवाडी , योगेश कुबल तालुकाध्यक्ष वेंगुर्ला , विवेक गवस विधानसभा युवक अध्यक्ष, ऋतिक परब विद्यार्थी अध्यक्ष, मनोज वाघमोरे , वैभव परब, नारायण आसोलकर सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रा. स.प आदि उपस्थित होते.