Site icon Kokandarshan

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला..तालुका प्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडी,दि.०३ : येथील विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी तब्बल २ वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडण्यात यावी, अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत, अशी भूमिका ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे मांडली.

दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी केवळ पार्टनरशिप आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी प्रकल्प मंजूर करून आणू नये तर सर्वसामान्यांच्या व्यथा लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असा टोला लगावला तर केसरकारांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असे सांगणाऱ्या राजन तेली यांनी गेल्या अनेक वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी काय केले? याचे त्यांनी उत्तर द्यावे, असेही श्री. राऊळ म्हणाले.

श्री. राऊळ यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्री केसरकर यांच्या विरोधात त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, मंत्री केसरकर यांना या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. फक्त आश्वासने द्यायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचे तेवढेच त्यांचे काम आहे. आजपर्यंत त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाही. त्याचा फटका सर्वसामान्य मतदारांना सहन करावा लागत आहे. केवळ आपली पार्टनरशिप असलेले आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित ठेवण्यासाठी ते काम करीत आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रकार सोडून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी तेली यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केसरकारांची तक्रार करणार असे तेली यांनी म्हटले होते. परंतु तक्रार करणाऱ्या राजन तेली यांनी गेल्या १० वर्षात सावंतवाडी मतदारसंघासाठी
काय केले? त्याचे उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात यावी, अशी आमची आग्रही भूमिका असणार आहे. त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका पक्षाकडे मांडणार आहोत. त्या ठिकाणी गेल्या २ टर्ममध्ये शिवसेनेचाच आमदार होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला सोडण्यात यावी, असा आमचा वरिष्ठांकडे आग्रह राहणार आहे.

यावेळी माजी सभापती चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, आबा केरकर, सिद्धेश नाईक, शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version