Site icon Kokandarshan

बांदा शहरातील व्यावसायिकांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या मार्फत छत्री वाटप..

सावंतवाडी,दि.०२: कोकणात भाजपाचे कमळ ज्या उत्साहाने फुलताना दिसत आहे, त्याच उत्साहात भाजपाचा छत्री वाटपाचा कार्यक्रमही पार पडताना दिसत आहे. कोकणचे नेते खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून भाजप प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला छत्री वाटपाचा कार्यक्रम त्याच उत्साहाने ठिकठिकाणी होत असलेला दिसून येत आहे.

आज भाजपातर्फे बांदा शहरात ओवेस कॉम्प्लेक्स परिसरातील बाजार पेठेतून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी सुनियोजित पद्धतीने मोठ्या प्रमाणात व्यावसायिक छत्र्यांचे वाटप गरजूंना केले.

भाजी, फळे, फुले विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना या मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वाटप करत त्यांना त्यांच्या व्यवसायात दिलासा देण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. जवळपासच्या गावातून बांद्यात येणाऱ्या महिला तसेच शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. फळे, फुले, भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंची उघड्यावर उन्हापावसात बसून विक्री करतांना या छत्र्यांचा आधार त्यांना मिळत आहे. सर्वसामान्य शेतकरी व महिला व्यवसायिकांनी विशाल परब यांच्या या कामाबद्दल मनापासून कौतुक करत भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन केले आहे.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य श्याम मांजरेकर, गुरु सावंत, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत, माजी सरपंच गुरू धारगळकर, शैलेश केसरकर मकरंद तोरसकर,पापु कदम ,साहिल कल्याणकर, गुरु कल्याणकर,ऋषी हरमलकर, विकी कदम, दिलीप बांदेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रीवाटप कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Exit mobile version