सिंधुदुर्ग,दि.०१: येथील दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे रविवार ३० जून रोजी रांगाणा गड दुर्गदर्शन व वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी ३९ दुर्गप्रेमीनी यात सहभाग घेतला.
सदर मोहिमेत गडावरील ऐतिहासिक वास्तू तसेच गडाचा इतिहास सहभागींनी जाणून घेतला. यावेळी रांगणा गडावर जांभूळ झाडांबरोबर इतर झाडे लावण्यात आली.
या मोहिमेला गणेश नाईक, समिल नाईक, समता वारंग, शिवाजी परब, रोहन राऊळ, हेमांगी जोशी, योगेश येरम, प्रसाद पेंडूरकर, हेमालता जाधव, अमोल भोगले, गार्गी नाईक, लक्ष्मण फोफळे, जालिंदर कदम, किरण मेस्त्री, संकेत सावंत, स्वप्निल सावंत, सोनी राऊळ, शशिकांत डांगरे, प्रसाद पालकर, राहुल मांडवकर, सुषमा पालव, स्वप्निल पालकर, महेश सावंत, डांगरे मॅडम, जगदीश धुरी, आदित्य जोशी, सानिया कुडतरकर, अमेय सावंत, श्वेता सावंत, सारिका वारंग, रामचंद्र वारंग, प्रणिता भोयर, मानसी परब, ऋतुराज सावंत, तेजस पोयेकर, संध्या सावंत, मनिष राणे, स्वप्निल राणे, मनिष कलिंगण, गणेश आनंदे आदी दुर्गप्रेमीनी सहभाग घेतला होता.
दरम्यान या मोहिमेसाठी नाश्ताची सोय सारिका वारंग यांनी तर सुषमा पालव यांनी झाडे उपलब्ध करून दिली. दात्यांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.