Site icon Kokandarshan

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोकणातून राष्ट्रवादीच्या विजयाची तुतारी फुंकली जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला आढावा बैठकीत अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला विश्वास…

पुणे,दि.२३ : राष्ट्रवादी प्रदेश‌ महिला पदाधिकारी बैठक पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया सुळे,महिला प्रदेशाध्यक्षा अँड. रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांची या बैठकीस उपस्थित होती. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह इतरबाबींचा आढावा घेण्यात आला.

कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.‌अर्चना घारे म्हणाल्या,कोकणातील जनता शरदचंद्र पवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आहे.तसेच महिला,युवतींची मोठी साथ कोकणातून मिळत आहे. बळीराजाची साथ आपल्यासोबत आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रियाताईं सुळे यांच्या नेतृत्वात कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रस्थानी राहील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकीत कोकणातून राष्ट्रवादीच्या विजयाची तुतारी फुंकली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत सौ. अर्चना घारे बोलत होत्या‌.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड. रोहिणी खडसे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा अँड. रेवती राणे, प्रदेश उपाध्यक्षा सौ.‌नम्रता कुबल यांच्यासह कोकण विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version