Site icon Kokandarshan

शेर्ले येथील शाळात धुरी कुटुंबियांकडून विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

सावंतवाडी,दि.२० : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेर्ले नंबर १ येथे शेर्ले गावातील दानशूर व्यक्ती अरुण धुरी आणि सौ लक्ष्मी धुरी कुटुंबीय गेली आठ वर्षे सातत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करीत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अरुण धुरी यांनी सर्व पालकांच्या उपस्थितीत पहिली ते पाचवीच्या एकूण ७२ विद्यार्थ्यांना वह्या,पेन्सिल, कंपास पेटी अशा शालेय उपयोगी वस्तू देऊन शाळेतील मुलांचे स्वागत केले. याप्रसंगी मुलांनी शिकावं खूप मोठं व्हावं आमच्याकडून व आमच्या कुटुंबिया कडून जेवढी काय मदत होईल त्या ती शाळेसाठी आम्ही करण्यासाठी सदैव तत्पर आहोत असे अरुण धुरी यांनी सांगितले.
यावेळी सौ लक्ष्मी धुरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल जाधव, उपाध्यक्षा सौ साईशा पराष्टेकर, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड सदस्या सौ करुणा धुरी, हुसेन शेख, सर्व पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी झेंडे यांनी केले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version