Site icon Kokandarshan

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद सिद्ध करू लियाकत शहा यांचे पक्षश्रेष्ठींना आश्वासन

लिखात शहा काँग्रेसचे नवे तालुकाध्यक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

चिपळूण,दि.१५: (ओंकार रेळेकर) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे नेते नानासाहेब पटोले यांनी व पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये तो मी विश्वास सार्थकी करेन असे चिपळूणचे नवनिर्वाचित काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष लिखात शहा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतील येऊ ठाकलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तर्फे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्यांचे पूर्ण ताकदीनिशी आम्ही काम करू आगामी काळात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व निश्चित कळेल असा विश्वास लियाकत शहा यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षश्रेष्ठीना अखेर मुहुर्त सापडला असून काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांची काँग्रेसच्या चिपळूण तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लियाकत शाहा यांना
नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
या निबडीचे चिपळुणात जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पक्षाचा व पदाचा
राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षात प्रवेश
केल्यापासून तालुकाध्यक्षपद रिक्त होते. मध्यंतरी
चिपळूणचे सुधीर दाभोळकर यांना तालुकाध्यक्ष पदावर
नियुक्ती देण्यात आली होती, मात्र त्यांच्या निवडीला
जोरदार विरोध करण्यात आला. कोणालाही विश्वासात न
घेता तसेच पक्षांतर्गत प्रक्रिया न राबवता परस्पर ही
नियुक्ती करण्यात आली, असा थेट आक्षेप घेत
पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे धाव
घेतली होती. अखेर सुधीर दाभोलकर यांची नियुक्ती दीड
दिवसात रद्द करण्यात आली होती. दरम्यान काँग्रेसचे
निरीक्षक चिपळूणमध्ये आले. त्यांनी इच्छुकांच्या
मुलाखती घेऊन पदाधिकाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले
होते. त्यानंतर मात्र हा विषय मागे पडला होता. गेले वर्षभर
तालुकाध्यक्षविनाच चिपळूण काँग्रेसचा कारभार सुरू
होता. मात्र शहराध्यक्ष म्हणून लियाकत शाहा चिपळूण –
काँग्रेसचे नेतृत्व करीत लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या
नेतृत्वाखाली काँग्रेसचे काम पूर्ण ताकदीने करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीनंतर शाहा यांना मुंबईत बोलावून
आ. नाना पटोले यांनी त्यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
– केली व नियुक्तीचे पत्र देऊन कामाला लागा असे आदेश
दिले आहेत, लियाकत शाहा हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत
असे कार्यकर्ते असून काँग्रेसचे शहराध्यक्ष, दोनवेळा
नगरसेवक, चिपळूणचे उपनगराध्यक्ष, असा त्यांचा राजकीय
प्रवास राहिला आहे. अत्यंत शांत, संयमी, तसेच उत्तम
संघटक, अशी त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख राहिली
आहे. काँग्रेस आमच्या रक्तात आहे. त्यामुळे पक्षासाठी
अहोरात्र काम करण्याची माझी नेहमीच तयारी असते.
तालुकाध्यक्षसारखे मोठे पद माझ्याकडे देऊन पक्षाने
माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यासाठी
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेस नेते हुसेन दलवाई,
माजी आ. हुसनाबानू खलपे, मंगेश शिंदे यांचा मी आभारी
आहे. ही जबाबदारी फार मोठी आहे, याची जाणीव मला
आहे. आता सर्वांना बरोबर घेऊन चिपळूणमध्ये काँग्रेसला
नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न मी करणार असल्याची
प्रतिक्रिया लियाकत शहा यांनी दिली आहे.काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड होताच काल शुक्रवारी लियाकत शहा यांनी महाराष्ट्राचे शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन पुढील वाटचालीस आशीर्वाद घेतला यावेळी लीयाकत शहा यांनी आमदार भास्कर जाधव यांची नुकतीच शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच आमदार जाधव यांनी देखील लीयाकत शहा यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version