Site icon Kokandarshan

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग ची वार्षिक सभा माणगाव-निळेली येथे संपन्न…

कुडाळ,दि.१५: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोशिएशन सिंधुदुर्ग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा माणगांव निळेली येथे जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी काही विषयावरील अहवालानुसार सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी कुडाळ , सावंतवाडी कणकवली तालुकाध्यक्ष प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देत व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष राकेश केसरकर, सचिव विष्णू चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद धुरी,नुतन जिल्हा खजिनदार मोहन पाटणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी,आनंद कांडरकर,जिल्हा महीला अध्यक्ष सौ.दर्शना केसरकर,बाळा कोरगांवकर, नामदेव जानकर सौ.मानसी परब,श्रीमती.मेस्त्री, मनोज तोरस्कर,मनोज वाजे,ऋषिकेश कोरडे,श्री,चव्हाण श्री.नारकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version