Site icon Kokandarshan

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट..!!

भेटी दरम्यान श्री पवार यांनी सिंधुदुर्गातील पाऊस व शेतकर्‍यांची केली आस्थेने चौकशी

सिंधुदुर्ग,दि.१०: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
पुणे मोदीबाग येथे ही भेट घेण्यात आली. आज १० जून २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी वर्धापन दिनाचा जल्लोष विजयोत्सव, सायंकाळी न्यू आर्टस, कॉमर्स आणि साइन्स कॉलेज, लाल टाकी रोड, दिल्ली गेटच्या मागे, अहिल्यानगर, नगर येथे होत आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या निमित्ताने आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व्हिक्टर डॉन्टस, उद्योजक संदीप घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान शरदचंद्र पवार यांनी कोकणातील पावसाची, शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करत कोकणच्या विविध विषयांवर चर्चा केली‌. व्यस्त कालावधीतून बहुमोल असा वेळ कोकणातील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला.

Exit mobile version