वेंगुर्ला,दि.३१ : ॲड. प्रकाश विश्राम बोवलेकर व सौ. प्रतिक्षा प्रकाश बोवलेकर यांचा सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर (वेंगुर्ले) यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय केरळ येथून मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी या विषयातून पीएचडी पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. बुधवार दिनांक २९ मे २०२४ रोजी त्यांना केरळ कृषी विद्यापीठ येथे पदवीदान समारंभात Ph.D (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) ही पदवी केरळ राज्याचे राज्यपाल मा. श्री.अरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
शालेय जीवनापासून अत्यंत हुशार असलेल्या अद्वैतने जिद्द चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर उच्चशिक्षण घेत यशाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.