Site icon Kokandarshan

नेमळे पंचक्रोशी मध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%

कु.प्रणया परशुराम राऊळ ९६%. गुण मिळवत प्रशालेत प्रथम

सावंतवाडी,दि.२७ : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी मध्यमिक आणि उच्च माध्यमिक विनेमळे पंचक्रोशी मध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००% लागला. या परीक्षेत ६४ पैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.

यात कु.प्रणया परशुराम राऊळ ९६% गुण मिळवत प्रथम,कु.काजल राजाराम घोंगे ९३.४०%. द्वितीय तर कु आर्यन अरविंद गोवेकर ९२.६० टक्के गुण मिळवून कशाला तृतीय आली.
कु वैभवी दीपक वजराटकर ९०.८० %.कु.भाग्यश्री अशोक पांगम ८७% यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
नेमळे हायस्कूल ची प्रणया राऊळ मळगाव केंद्रताही प्रथम तसेच काजल घोंगे मळगाव केंद्रात द्वितीय आली या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भी. राऊळ, प्राचार्या कल्पना बोवलेकर, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ तसेच शिक्षक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version