कु.भूमी आनंद परब ८९.८०% गुण मिळवत प्रशालेत प्रथम
सावंतवाडी,दि.२७: तालुक्यातील चौकुळ इंग्लिश स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला असून कु.भूमी आनंद परब हिने ८९.८०% गुण मिळवले असून ती प्रशालेत प्रथम आली.कु.ऐश्वर्या संतोष गावडे ८९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय तर कु. रिया सुरेश शेठ, ८७.८०% गुण मिळवत प्रशालेत तिसरी आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत चौकुळ इंग्लिश स्कूल मधून एकूण २० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये आठ विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणी व एक विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, गावातील सरपंच तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.