सावंतवाडी,दि.२३: वेत्ये गावातील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
सर्वांना सुखी,आनंदी ठेव, दीर्घायुष्य दे ,बळीराजासाठी चांगला पाऊस येवू देत, अशी प्रार्थना सौ. अर्चना घारे यांनी श्री देव कलेश्वर पूर्वी देवी चरणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वेत्ये गावचे प्रथम नागरिक सरपंच गुणाजी गावडे,माजी सभापती रमेश गांवकर,मोहन गांवकर, आप्पाजी गांवकर,हरिश्चंद्र गांवकर,राष्ट्रवादी महीला सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा सौ. नितीशा नाईक, युवती अध्यक्षा सौ.सावली पाटकर, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदी उपस्थित होते.