सावंतवाडी,दि.३०: भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ इन्सुली डोबाचीवाडी येथे कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.
यावेळी बोलताना भारतीय जनता पक्ष हा कोकणच्या मातीत रुजलेला पक्ष आहे.
कोकणी जनता कायमच मंत्री राणे आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे.
या निवडणुकीत ही श्री राणे प्रचंड बहुमताने विजय होतील, असा विश्वास यावेळी श्री परब यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, शिंदे गट तालुका प्रमुख बबन राणे,इन्सुली भाजपा विभाग अध्यक्ष विठ्ठल पालव,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख नितीन राऊळ , इन्सुली ग्रामपंचायत सदस्य वर्षा सावंत, साबाजी परब, अजय सावंत ,नाना पेडणेकर,औदुंबर पालव , महेंद्र सावंत , दिलीप पेडणेकर ,शिवा सावंत, सुनिल सावंत ,समीर सावंत, प्रल्हाद सावंत,प्रथमेश सावंत , देवदास सावंत, श्रीकृष्ण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.