यानिमित्त मंदिरात सुप्रसिद्ध गायक “अजित कडकडे” यांचा गायनाचा कार्यक्रम
सावंतवाडी,दि.३०: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचा पूनप्रतिष्ठापन सोहळा उदया बुधवार ०१ मे रोजी संपन्न होणार आहे.
या सोहळ्यानिमित्त सकाळ पासून विवध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा रात्रौ साडेसात ७.३०वाजता गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी संगीत स्वरांची सुरेल मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भक्तगणांनी व रसिकवर्ग यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकर मंडळी व ग्रामस्थ व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.