सावंतवाडी,दि.३०: माठेवाडा-झिरंगवाडी येथील श्री ब्राह्मण पाटेकर मंदिर सुशोभीकरणासाठी लागणारे आर्थिक सहाय्य युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. येथील स्थानिकांनी श्री. परब यांच्याकडे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मागणी केली होती. दरम्यान परब यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून मंदिराच्या कामासाठी तात्काळ मदत करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे.