चिपळूण,दि.२७(ओंकार रेळेकर): अनंत गीते मतदार संघात कुठे दिसत नाहीत कोणाच्या सुखदुःखात नाहीत अनंत गीते दिसले की समजायचं निवडणुका आल्यात अशी कोपरखळी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी गीते यांना लगावली गुहागर मतदारसंघाच्या विकासाची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे. नातू आणि मी आता हातात हात घालून काम करणार आहोत गुहागर मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज लागणार नाही नातू साहेब आम्हाला साथ द्या ओ कारण जबाबदारी विकासाची मी घेतली आहे एकदा मला पाडलेत आता पाडू नका अशी भावनिक साद माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी विनय नातू यांना घातली. आता लोकसभेला घड्याळ चिन्ह आहे तर विधानसभेला धनुष्यबाण चिन्ह असणार आहे सुनील तटकरे यांची उमेदवारी मीच मागून घेतली आहे ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी आम्ही जाहीर केले आहे की रायगड लोकसभा मतदारसंघातील खेड दापोली मंडळ विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य देणार असे रामदासभाई कदम यांनी सांगितले.
रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा तालुक्यातील धामणंद येथे शुक्रवारी दुपारी संपन्न झाली यावेळी रामदासभाई कदम बोलत होते.या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे ,महाराष्ट्राचे शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई, कदम , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष अजिंक्य आंब्रे, जिल्हा सरचिटणीस दीपक गुजर,
माजी आ.विनय नातू,शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव,
उपसभापती अण्णा कदम,जि.प माजी सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख अरविंद चव्हाण ,जि. प माजी सदस्य सुनील मोरे , गुहागर संपर्क प्रमुख बापू आंब्रे,उपसभापती जीवन आंब्रे,भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा नेत्या सौ.चित्राताई चव्हाण, गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रकांत चाळके, राष्ट्रवादी खेड तालुका अध्यक्ष सतू कदम, राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष अजिंक्य आंब्रे,
राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश लाड,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दत्ताराम गोटल,शिवसेना विभाग अध्यक्ष सुशांत कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
फक्त समाजाच्या नावाने निवडून यायचं हा एक कलमी कार्यक्रम आपण अनेक वर्षापासून पाहिलेला आहे असा टोला रामदास भाई कदम यांनी लगावला ते पुढे म्हणाले की माझे एक स्वप्न आहे .पिण्यासाठी कोयनेचे पाणी मी उचलणार आहे हा प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला आणि कामाला मंजुरी पण मिळाली कामाला सुरुवात पण झाली सर्वे पण चालू झाला हे काम पुढे नेण्यासाठी मला तटकरे यांच्या सारखा खासदार हवा आता लोकांना गावोगावी घरोघरी कालव्याचे पाणी मुबलक मिळणार आहे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा गीते साहेब एक काम दाखवा हे काम मी केले म्हणून ३५ वर्षात किती बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिलेत सांगा असा सवाल रामदास कदम यांनी गीते यांना विचारला मोदी सरकारचे कौतुक करताना रामदास कदम म्हणाले की संपूर्ण जगात देशाचे नाव उंचवण्याचे काम या मोदी सरकारने केले आहे.
सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. मनोहर सकपाळ ,दत्ताराम मोरे ,विलास कदम ,विष्णू कदम, सुरेश पवार, गौतम शिंदे, संजय उतेकर ,दत्ताराम मोरे, संजय जाधव, उमेश देवरुखकर योगेश आंब्रे,सुरेश रेवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके ,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन चाळके ,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संकेत दुमणे, तालुका सरचिटणीस नितीन मोरे, तालुका सचिव किरण आंब्रे, स्वप्निल गुरव, बाबा पडवेकर ,संदेश म्हापदी संजय झडेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.