Site icon Kokandarshan

दिपेश शिंदे यांच्याकडून भाजप पक्षाच्या “कमळ चिन्हाचा” अनोखा प्रचार..

युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा पुढाकार

सावंतवाडी,दि.२६: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजापूर येथे होत असलेल्या भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःच्या शरीरावर भाजप पक्षाचे कमळ हे चिन्ह रंगवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवार,पदाधिकारी,कार्यकर्ते बैठकीवर जोर देऊन लागले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत भाजपाकडून नारायण राणे हे निवडणुक रिंगणात उतरले आहेत.याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा राजापूर येथे आयोजित केली आहे. या सभेत भाजपाच्या संपुर्ण अंग भाजपामय रंगविलेल्या सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून आणि सौजन्याने श्री शिंदे यांनी अंगावर ही रंगरंगोटी केली आहे. एकप्रकारे कळम हे चिन्ह जनतेपर्यंत पोहचवून लाडक्या दादांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी विशाल परब यांनीही आपल्या परीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

Exit mobile version