Site icon Kokandarshan

सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील बंदिस्त गटाराचे भूमिपूजन

सावंतवाडी दि.२९ : शहरातील भटवाडी येथील बंदिस्त गटाराचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक व्हिक्टर डिसोजा आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार विकास फंडातून पाच लाख रुपये खर्चाच्या बंदिस्त गटाराचे भूमिपूजन पार पडले
या बंदिस्त गटारासाठी माजी नगरसेविका दिपाली सावंत, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी प्रयत्न केले होते.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, दत्ता सावंत, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, अमिता वाँच, कैतन वाँच, लॉरेन्स डिसोजा, एनी डिसूजा, ख्रिस्तालीन डिसोजा, रिटा डिसोजा, कॉलिंग वॉच, जॉयसी डिसोजा, श्री हळदणकर तसेच अश्वमेध कन्स्ट्रक्शन चे समीर परब कंत्राटदार दादा नागनुर, शिक्षक श्री वरक आदी उपस्थित होते.
शहरातील भटवाडी येथील व्हिक्टर डिसूजा यांच्या घरापासून श्री गिरगोल यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर आल्यामुळे रस्त्याची होणारे दुर्दशा टळणार आहे बंदिस्त गटार मंजूर केल्याबद्दल यावेळी मंत्री दीपक केसरकर यांचे स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version