Site icon Kokandarshan

असनियेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित

सावंतवाडी,दि.२६: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, असनिये ग्रामपंचायत आणि शिवतेज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २८ एप्रिल मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत असनिये प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात येणार आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी असनिये ग्रामपंचायत पदाधिकारी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे, शिवतेज मंडळाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत..या शिबिराच्या अधिक माहितीसाठी दिनेश सावंत ९४०४७५९११० आणि राकेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा.
असनिये गावातील तसेच परिसरातील घारपी, झोळंबे, फुकेरी, तांबोळी, कोनशी या गावातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत आणि शिवतेज मंडळ यांनी केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version