Site icon Kokandarshan

सावंतवाडीत उद्या साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी,दि.२४: शहरातील भवानी चौक येथील साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवारी (दि. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे भजन, रात्री ८ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘रक्तवर्ण जन्म’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईभक्त मंडळ भवानी चौक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version