Site icon Kokandarshan

खा.विनायक राऊत यांच्या शिफारशीने पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी..

सावंतवाडी तालुक्यात पाच कामांना मंजुरी उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती

सावंतवाडी,दि.२९ : तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून २५ किलोमीटरचे ५ रस्ते मंजूर झाले आहेत.प्रामुख्याने इन्सुली गावात महत्त्वाचे दोन रस्ते मंजूर झाले आहेत, अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.
खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून १५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरीची शिफारस केली होती त्यात सावंतवाडी तालुक्यातील पाच कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील २५ किलोमीटर रस्त्यांची कामे लवकरात लवकर होतील असा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, इन्सुली गावातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांना यामध्ये मंजूरी मिळाली आहे. त्यात इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये सोनुर्ली रस्ता ३.१६५ किमी,निगुडे पिटीलवाडी सावंतटेंब कोंडवाडा एक्साईज दलीतवाडी रस्ता ५.१०५ किमी , याशिवाय पारपोली देवसू ओवळीये कलबिंस्त ५.१ किमी,तिरोडा सदानंद मठ गुळदूवे ५.४५ किमी, बांदा बांदेश्वर मंदिर सटमट डिगंणे रस्ता ५.१०५ किमी, आदी कामे पंतप्रधान सडक योजनेतून खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार मंजूर झाली आहेत असे राऊळ यांनी सांगितले.

Exit mobile version