Site icon Kokandarshan

बाळासाहेबांच्या स्मारकाला हात लावल्यास सहन केल जाणार नाही.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी,दि.१६: हिंदू हृदय सम्राट सरसेनापती कै. बाळासाहेब ठाकरे यांचं कल्पवृक्ष रुपी जिवंत स्मारक सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणे कोंड धरणा वरती आहे.
मात्र नवीन होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील फिल्टरेशन प्लांट च्या लाईन आऊट मध्ये सदर स्मारक दिसत आहे प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढावा हे स्मारक कसं वाचवता येईल ते बघावं प्रशासनाने या स्मारकाला हात लावल्यास सहन केलं जाणार नाही या जिवंत स्मारकामध्ये अनेक शिवसैनिकांचा तसेच आमच्याही भावना गुंतलेल्या आहेत.
बाळासाहेबांच्या स्मारकाला हात लावल्यास तीव्र विरोध करू असे आव्हान माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

Exit mobile version