Site icon Kokandarshan

निगुडे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थान चा २० एप्रिल २०२४ रोजी ९६ वा वर्धापन दिन सोहळा..

सावंतवाडी,दि.१३: येथील निगुडे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा ९६ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी श्रींची पूजाअर्चा १०:०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी ०१:०० महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल व रात्री ठीक ०९:०० वाजता श्री. विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा महानपौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती निगुडे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Exit mobile version