माजी सभापती धनश्री शिंदे यांचे महाविकास आघाडी सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन
चिपळूण,दि.१२: अलोरे पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना खासदार विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळवून देणार असून शिवसेना कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ,महिला शक्ति जोरदार कामाला लागले आहेत . शिवसेना पक्षश्रेष्ठी आणि खा.विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या पंचक्रोशीत मी सभापती असताना केलेली विकास कामे या निवडणुकीत
कामी येतील असा विश्वास व्यक्त करून राऊत यांना चांगले मताधिक्य मिळेल असे माजी सभापती धनश्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.शिवसेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांच्या सभापती कार्यकाळात अलोरे पंचक्रोशी मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना शिंदे यांनी विकासकांसोबतच पक्षसंघटना वाढीवरही विशेष लक्ष दिले आहे. माटे सभागृह येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात अलोरे गटातील विभाग प्रमुख सुप्रिया शिंदे, ओवळी महिला शाखाप्रमुख वृषाली पाटणकर ,दादर महिला शाखाप्रमुख जयश्री सकपाळ,ओवळी ग्रामपंचायत सदस्य माधवी शिंदे,साजी पवार,स्मिता राजवीर,तसेच ओवळी,दादर ,गाणे,पिंपळी, बुद्रुक,खुर्द येथील महिला धनश्री शिंदे यांच्या सोबत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.विधानसभा संघटक रुमा देवळेकर ,उपजिल्हा प्रमुख ऐश्वर्या घोसाळकर ,शहर प्रमुख वैशाली शिंदे यांच्या पुढाकारानेही इंडिया आघाडीच्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.