सावंतवाडी येथील बिस्मिल्ला शहा दर्गा चे काम करताना सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व त्यांचे कामगार
सावंतवाडी,दि.२७: शहरातील जिमखाना लाखेवस्तीतील कोसळणारे स्लॅबची डागडुजी आणि बिस्मिल्ला शहा दर्गा च्या दुरुस्तीचे काम सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सुरू केले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री चलवाडी यांनी मुस्लिम बांधवांचा बाहेरचा वाडा येथील दर्गा हजरत पीर मलंग शहा उर्फ बिस्मिल्ला शहा रहमतुल्ला अल्ले या पीर बसणाऱ्या दर्ग्याच्या
प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे कामही केले आहे.
सावंतवाडी शहरातील जिमखाना येथे पन्नासहून अधिक लाखे कुटुंबीयांना सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीट ची आरसीसी घरे देण्यात आली आहेत गेल्या काही वर्षापासून या घरांच्या स्लॅबला तडे गेल्यामुळे घरातील कुटुंबीयांचे सुरक्षितता धोक्यात आली होती स्लॅबचे तडे गेल्यामुळे स्लॅबचे काँक्रीट पडून मोठी दुर्घटना होऊ शकते मात्र याकडे लाखे कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सामाजिक बांधिलकीतून तात्काळ शासकीय मदतीची वाट न पाहता किंवा निधी मिळेल याची प्रतीक्षा न पाहता स्वखर्चातून या सर्वच्या सर्व स्लॅब ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे याच कामाबरोबर बिस्मिल्ला शहा दर्ग्याच्या दर्शनी भागातील दुरुस्तीचे काम हे त्यांनी हाती घेऊन पूर्ण केले याबद्दल लाखेवस्तीतील पन्नासहून अधिक कुटुंबे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्यासह मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.