जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ च्या विद्यार्थ्यांची यशस्वीपूर्ण कामगिरी
सावंतवाडी,दि.०४: सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा २०२३-२४ चा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ च्या विद्यार्थ्यांची यशस्वीपूर्ण कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेमध्ये सात विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल,सात विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल तर आठ विद्यार्थ्यांनी ब्रांझमॅडल पटकाविले.
यामध्ये आदित्य,पार्थ मयेकर, स्वानंदी,मिताली, अन्वी, वीरा व वरद या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडलं पटकाविले.तर सिया,मयुरेश,भूमी, बसवराज,श्रीशा , राजवीरसिंह, प्रिया या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल. वीर,आराध्य,दर्श, काव्या, दुर्वा,हर्ष,आर्या या विद्यार्थ्यांनी ब्रांझ मेडल पटकावून शाळेला भरघोस बक्षिसे प्राप्त करून दिली.
यावेळी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक पावरा सर,पदवीधर शिक्षिका धारगळकर मॅडम,सावंत मॅडम,पवार मॅडम,घाडी मॅडम, पित्रे सर, धोंड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व विध्यार्थ्यांचे सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर व सर्व सदस्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.