नागपूर येथे मदत सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
सिंधुदुर्ग,दि.२७ : येथील समाजसेवेची आवड असलेले कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारे असे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री सुभाष साबळे सर यांना आज दि.२६ डिसेंबर२०२२ रोजी नागपूर येथे मदत सामाजिक संस्था वतीने राज्यस्तरीय डॉ सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भारतीय संविधान शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुभाष साबळे हे प्राथमिक शिक्षक असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कूतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. याआधी विविध स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.यावेळी आमदार माजी उर्जा व पालकमंत्री नागपूर डॉ नितीन राऊत,आमदार अभिजित वंजारी आमदार, लाँगमार्च नेते प्रा.जोगेंद्र कवाडे, नाळ चित्रपटातील सिनेकलाकार तक्षशिला वाघमारे,गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष अँड.अशोक यावले,मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रा.प्रकाश सोनक सचिव दिनेशबाबू वाघमारे आदींची उपस्थिती होती.