Site icon Kokandarshan

वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था..

बंटी माठेकर मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम.

सावंतवाडी,दि.२८: कडक उन्हाळा सुरू झाला आहे वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भर वस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये,याकरिता बंटी माठेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून वन विभागाला वारंवार पत्र देऊन देखील वन विभागाने याची अध्यापही दखल घेतली नाही. अखेर शेवटी वन्य प्राण्यांना पाणी मिळावं याकरिता मदारी रोड सासोलकर मैदान शेजारी या मित्र मंडळाने कृत्रिम पाण्याची तळी तयार केली आहे.
या उपक्रमात अमित सावंत, संजय नाईक, सचिन सासोलकर, बाळा सोनकर, बंटी माठेकर, प्रसाद जोशी व पाटकर यांनी पुढाकार घेऊन वन्य प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. अशाच प्रकारे वन विभागामार्फत देखील ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याची तळी तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाणी पाण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये वन्य प्राणी येऊ नये याकरिता देखील वन विभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी बंटी माठेकर मित्र मंडळाने केली आहे.
या मित्रमंडळाने केलेल्या कार्याचे वन्य प्राणी व पक्षी मित्रांकडून कौतुक होत आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version