हे काम ईश्वरी शक्ती मुळे शक्य झाले..सीताराम गावडे
सावंतवाडी, दि.२७: त्रेमासीक आमची एकजूट च्या वतीने सलग पंचवीस वर्षे सद्गुरू साटम महाराजांच्या जिवनकार्याचा आढावा घेणारा विशेषांक सीताराम गावडे व त्यांचे सहकारी प्रकाशित करीत आहेत व ही खऱ्या अर्थाने ईश्वरी सेवा आहे,महाराजांच्या जीवन कार्याची महती सर्व दूर पसरविण्यासाठी सीताराम गावडे यांची धडपड वाखाण्याजोगी आहे व सलग २५ वर्षे विशेषांक प्रसिद्ध करणे हे काम ईश्वरी शक्ती मुळे शक्य झाले असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांचे राजे खेम सावंत भोसले यांनी आमची एकजूट साटम महाराजांच्या विशेषांकाच्या प्रकाशनच्या वेळी बोलताना केले.
त्रैमासिक आमची एकजूट गेली पंचवीस वर्षे सद्गुरू साटम महाराजांच्या जिवनकार्याचा आढावा घेणारे लेख गोष्टी स्वरुपात छापून महाराजांची किर्ती सर्वदूर पोहचविण्याचे काम करीत आहेत हे महान कार्य आहे,बापूसाहेब महाराजांचे गुरु सद्गुरू साटम महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे असे गौरवोद्गार काढले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेली अनेक वर्षे सद्गुरू साटम महाराजांच्या विशेषांकाचे प्रकाशन माझ्या उपस्थितीत पार पडले व त्याचे भाग्य मला लाभले ही सद्गुरू सेवा सीताराम गावडे यांनी अशीच सुरू ठेवावी असे आवाहन केले.
संपादक सीताराम गावडे यांनी गेली पंचवीस वर्षे साटम महाराजांच्या जिवन कार्याचा आढावा घेणारा विशेषांक प्रकाशित करताना अनेकांचे मदतीचे हात उभे राहिलेत त्यातूनच ही ईश्वरी सेवा घडत गेली,आता पंचवीस विशेषांक प्रकाशित झाले या पूढेही असेच कार्य पुढे सूरु ठेऊ असे स्पष्ट केले.
या प्रसंगी राजे खेम सावंत भोसले,राणी सरकार शुभदा देवी भोसले, युवराज लखम राजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, डॉ सतीश सावंत,कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ब्यूरो चिफ विशाल पित्रे, जाहिरात व्यवस्थापक नाना धोंड, उपस्थित होते.