Site icon Kokandarshan

निराधार महिलेसाठी सिद्धेश ब्रिद ठरला देवदूत…..

सिद्धेश ब्रिद च्या दिलदार कामगिरीचे जिल्हाभरात कौतुक

चिपळूण,दि.२७:(ओंकार रेळेकर)तालुक्यातील तांबेडी गावातील रहिवासी असलेल्या प्रतिभा भारती यांच्या घराला काल रात्री लागलेल्या आगीमुळे संपूर्ण घर बेचिराग झाल्याची घटना घडली. एन शिमगोत्सव काळात लागलेल्या या आगीत प्रतिभा भारती यांचे प्रचंड नुकसान झाले असून विधवा असलेल्या या महिलेसमोर दुःखाचा मोठा डोंगर उभा राहिला, दरम्यान याच तालुक्यातील तरुण असलेल्या सिद्धेश ब्रिद यांच्या कानावर ही घटना गेल्यानंतर त्यांनी तत्काळ घटास्थळी भेट देत सणासुदीच्या काळात महिलेवर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांना धीर देत तुमचं घर पुढच्या चोवीस तासात पुन्हा उभ करू असा शब्द देत स्वखर्चाने घर उभारणीच्या कामाला सुरवात देखील केली आहे.त्यामुळे सिद्धेश ब्रिद यांच्या या कृतीचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. प्रतिभा यांना एक मुलगा असून तो नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या. शनिवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किट मुळे त्यांच्या घराला मोठी आग लागली,या घटनेत त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेनंतर प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असला तरी शासकीय मदतीची वाट न पाहता सिद्धेश ब्रिद यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना तत्काळ मदत करून माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण निर्माण केले आहे.

Exit mobile version