Site icon Kokandarshan

सिताराम गावडे मित्र मंडळ कडून २४ मार्च रोजी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी,दि.२१: येथील बिरोडकर टेंब येथे सीताराम गावडे मित्रमंडळ आयोजित अंडर फोरटीन (नववी पर्यंत)भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा रविवार दि २४ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभाग घ्यावा असे आवाहन सीताराम गावडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०० रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम १००० व आकर्षक चषक तसेच, सामनावीर, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी
सागर गावडे : ९५०३५०१०८३
साईश गावडे : ७५८८६४१६९५,
गुरुप्रसाद गावकर : ९४२१३०९६६८
यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version