Site icon Kokandarshan

स्व.प्रा.मिलिंद भोसले, कै. अँड.दीपक नेवगींच्या स्मृतींचा जागर

‘कोमसाप’तर्फे सतिश पाटणकर, संजय कात्रेंना पुरस्कार प्रदान

सावंतवाडी, दि .१५: साहित्यिकांच्या हत्या करण्यापर्यंत लोक पोहचलेत. साहित्यिकांनी असं काय केलं की ही वेळ त्यांच्यावर यावी, त्यांना संरक्षणात रहावं लागावं. त्यांनी केवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात. परंतू, त्यांच लिखाण एवढं का झोंबाव ? की समोरच्या माणसालाच ठार माराव. अशान माणूस मरेल पण, त्याचे विचार मारता येणार नाहीत असं प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांनी व्यक्त केलं. कोमसाप शाखा सावंतवाडीतर्फे आयोजित स्व.प्रा. मिलिंद भोसले व कै. अँड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणा दरम्यान ते बोलत होते.

श्री. सावंत म्हणाले, साहित्यिकांनी आपला धर्म सोडू नये. साहित्य हे प्रगल्भ असलं पाहिजे. राणी पार्वती देवीच्या या संकुलात कवी केशवसुत शिक्षक होते. याच ढोलकाठीवर बसून कविवर्य डॉ वसंत सावंत यांनी कविता लिहिल्या आहेत. हा वारसा ही परंपरा सिंधुदुर्गला विशेष करून सावंतवाडीला आहे‌. ही परंपरा जोपासण्याच काम कोमसापच्या माध्यमातून ही नवीन पिढी करत आहे. कै.अँड दीपक नेवगी कविल असले तरी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच काम केलं. तर प्रा. मिलिंद भोसले या प्रशालेतच प्राध्यापक होते‌. मराठी विषयावर त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेतून त्यांची उंची खूप मोठी असल्याचं जाणवायच, अशा माणसांनच्या नावानं देण्यात आलेले पुरस्कार स्तुत्य आहेत असं मत विकास सावंत यांनी व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्यावतीनं स्व.प्रा ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आलेले पुरस्कार निवेदक, आदर्श शिक्षक प्रा. संजय कात्रे यांना प्रदान करण्यात आला. तर कै.ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं. पुरस्काराला उत्तर देताना संजय कात्रे, सतिश पाटणकर यांनी मनोगत व्यक्त करत ऋण व्यक्त केले. याप्रसंगी कोमसापचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती‌. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी न.प.मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, सौ. उषा परब, कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत, डॉ. जी. ए.बुवा, प्रा‌. विजयप्रकाश आकेरकर, अमोल टेंबकर, दीपाली नेवगी, अनिल भोसले, अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अँड. अरूण पणदुरकर, अँड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, दीपक तुपकर, दीपक पटेकर, चंद्रकांत कात्रे, सौ.‌संपदा कात्रे, विनायक गांवस, नीरज भोसले, मंगेश मेस्त्री, सर्वेश राऊळ, नितेश देसाई, भुवन नाईक, कमलाकर कळंगुटकर, महेश पास्ते, प्राची दळवी, भाई साटेलकर, श्री. धुरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव राजू तावडे यांनी केल. सुत्रसंचालन सदस्य विनायक गांवस तर आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले.

Exit mobile version