दोडामार्ग,दि.१५ : श्री खंडोबा, सातेरी, केळबाई, शंभु महादेव, म्हारिंगण पंचायतन देवस्थानचा प्रतिष्ठापना २१ वा वर्धापनदिन सोहळा मिती फाल्गुन शु. शनिवार दि.१६ मार्च रोजी साजरा होणार आहे.
या निमित्त सकाळी ९ ते ११ सर्व देवतांना महाअभिषेक, ११ ते १ वा. श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजनाचा कार्यक्रम, राञी १० वा. आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरगवे ग्रामस्थांनी केले आहे.
श्री खंडोबा पंचायतन सरगवे देवस्थानचा १६ मार्च रोजी वर्धापनदिन सोहळा
