देवगड, दि.१३: माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पाटथर,आसरोंडी, दाभोळे आदी गावातील विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या शुभहस्ते पार पडले, यामध्ये..
१) इळये आसरोंडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे मंजूर निधी ३४ लाख,
२) पाटथर कुणकेश्वर मुख्य रस्ता सचिन जोशी घर ते करंजेकर घरापर्यंत चा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे मंजूर निधी ५ लाख,
३) दाभोळे सत्वपुरुष मंदिर कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे मंजूर निधी ५ लाख, आदी विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच माजी जि प सदस्या मनस्वी घारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
मनस्वी घारे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मतदार संघात विविध विकास कामे सुरू असून आमदार नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मनस्वी घारे यांनी व्यक्त केले आहेत, मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असून यापुढे देखील मतदार संघाच्या विकासासाठी आपले प्रयत्न राहतील असे प्रतिपादन यावेळी माजी जि.प सदस्या मनस्वी घारे यांनी व्यक्त केले, यावेळी चिंतामणी घारे,सानिका पवार,लता करंजेकर,सुप्रिया थोटंम,प्रतीक्षा मेस्त्री,अनिता मेस्त्री,सुनंदा मेस्त्री,सचिन जोशी,विजय जोशी,बाळा करंजेकर,सचिन मेस्त्री, गोटू थोटम,शांताराम थोटम,बंटी कदम,प्रतीक कदम,रेश्मा पवार,माधवी पवार,आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.