Site icon Kokandarshan

माडखोल येथील व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी चे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे –

सावंतवाडी,दि.०६: शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल चे स्नेहसंमेलन दिनांक 5/3/2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले त्यावेळी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
त्या वेळी व्यासपीठावर डाॅ युवराज पांढरे ,(प्राचार्य, पुष्पसेन सावंत कॉलेज डिगस,कुडाळ) डॉ तुकाराम केदार (प्राचार्य,सरस्वती फार्मसी कॉलेज,तोंडवली- कणकवली) डॉ सचिन चंदावरकर ( प्राचार्य, ASPM कॉलेज ऑफ फार्मसी,सांगुळवाडी- वैभववाडी) श्री अमोल तांगडे ( प्राचार्य,रायगड कॉलेज ऑफ फार्मसी, महाड) श्री चंद्रशेखर बाबर ( इन्चार्ज प्राचार्य, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी , कणकवली ) तसेच प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील, व्हि पी कॉलेज प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे सर, एचऒडी डॉ संदेश सोमनाचे सांस्कृतिक प्रमुख दिप्ती फडते उपस्थित होते यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ,शाल व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी मार्गदर्शन केले तद्नंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

Exit mobile version