कणकवली,दि.०६: येथील शि. प्र. मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात दिनांक ४ मार्च २०२४ रोजी “मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर “च्या माध्यमातून दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. कविता लघाटे, डॉ. हेरेन दंड, महाविद्यालचे प्र. प्राचार्य युवराज महलिंगे महालिंगे, अंतर्गत गुणवत्ता आणि हमी कक्षा चे प्रमुख डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. सोमनाथ कदम, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यशालेला डॉ. कविता लघाटे यांनी संबोधित करताना कार्यशाळेचे उद्दिष्ट सांगितले.
“नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी, पालक व समाज यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे त्यातून या धोरणाची गुणवत्ता दिसून येणार आहे. कोणतीही गोष्ट नवीन शिकताना अनेक अडचणी येत असतात. त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन मोलाचे ठरेल” असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखेच्या अधिष्ठाता डॉ. कविता लघाटे यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. “आपल्याकडे चार महत्वाच्या क्षमता असणे गरजेचे आहे. तरच आपल्यामध्ये नाविन्यता येते. नवीन गोष्टीचा स्वीकार कारणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही” असे मत यावेळी डॉ.साळुंखे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले. प्राचार्य प्रतिनिधी डॉ. शिवराम ठाकूर प्राध्यापक प्रतिनिधी प्राध्यापक प्रा. एम् एम.कामत व उपस्थित प्रतिनिधींचे यावेळी स्वागत करण्यात आले.
उद्घाटन सत्राचे सूत्र संचालन डॉ.सोमनाथ कदम यांनी व आभार प्रदर्शन डॉ. प्रा. बाळकृष्ण गावडे यांनी केले.
या कार्यशाळेसाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण ११७ प्रतिनिधी उपस्थित होते.