Site icon Kokandarshan

सावंतवाडीत मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकारी व सदस्यांकडून गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांचा सत्कार

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची विविध वैद्यकीय सुविधांबाबत चर्चा

सावंतवाडी,दि.०४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांचा गोव्यातील आयुर्विज्ञान संस्थेत विशेष सहाय्य घेण्यात येणार असून या संस्थेत चालणाऱ्या नवनवीन प्रयोगाबाबत लवकरच येथील डॉक्टरांना माहिती देण्यात येणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी रविवारी रात्री उशिरा सावंतवाडीतील यशराज हाॅस्पीटल येथे सावंतवाड़ी मेडिकल असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली,अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महेश सारंग डाॅ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर,मिलिंद खानोलकर, सुरज देसकर, रेवण खटावकर,संदिप देशपांडे, डॉ.कश्यप देशपांडे, राजशेखर कार्लेकर,अनिश स्वार आदि यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी प्रथम येथील डाॅक्टरा च्या समस्या जाणून घेतल्या त्यात अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळ यांनी सावंतवाड़ी मेडिकल असोसिएशन च्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.तसेच मेडिकल असोसिएशन चे डॉ मिलिंद खानोलकर यांनी गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता सेवा सोबतच म्हापसा येथिल अजिलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवजात रुग्णाना उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी केली .
मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नी लक्ष घालू असे आश्वासन यावेळी उपस्थित डॉक्टरांना दिले .तसेच धारगळ येथील आयुर्विज्ञान संस्था गोवा येथील रुग्णालयात मेडिकल असोसिएशन चा सहभाग वाढवून विशेष आधुनिक सेवा सामंज्यस्य करारा द्वारे सर्व सामान्य नागरीकास उपलब्ध केल्यास अधिक रुग्णाना याचा फायदा होइल असे सांगितले.तसेच गोवा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आयुर्विज्ञान संस्थान च्या रूग्णालयात येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा द्यावी तेथील नवनवीन प्रयोग अभ्यासावेत असे आवाहन यावेळी केले.यावेळी मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकार्‍यांंकडून डाॅ.प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version