सावंतवाडी,दि.०२: शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक कै.अनिल भाई परूळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हाॅस्पिटलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रास्ताविक केले आणि बबनराव साळगांवकर,उमेश कोरगांवकर, संजय पेडणेकर यांनी अनिल भाई परूळेकर यांच्या ऐंशीच्या दशकातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या कार्याबद्दल सांगितले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी आठ गरजू लाभार्थ्यांना सामंत ट्रस्ट तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
बांदा येथील अजित बांदेकर,दिव्यांग असलेले कृष्णा मेस्त्री, कर्करोग पिडित विष्णू केळूसकर,निरवडे येथील आपा जाधव, माडखोल येथील विजया राऊळ, असनीये येथील उमाजी असणकर,कास येथील कृष्णा कासकर आणि शैक्षणिक मदतीसाठी शेडगे अशा आठ जणांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.