Site icon Kokandarshan

नरेंद्र मोदींची मोरबी घटनास्थळी भेट, रुग्णालयातील जखमींचीही घेतली माहिती…

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजराकमधील मोरबी येथे आहेत. रविवारी संध्याकाळी पूल दुर्घटना घडल्यामुळे त्या अपघातात 135 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोरबी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर ते जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयातही गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी बचावकार्यात काम केलेल्या अनेकांची भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व घटनाक्रमाची माहिती घेतली.

यावेळी मदतकार्य करणआऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दुर्घटनेतील सर्वांना मदत पोहचवण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.

यावेळी नरेंद्र मोदी यांना घटनास्थळी सुरू करण्यात आलेल्या मदत आणि बचाव कार्याचीही माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी, मुख्य सचिव पंकज कुमार आणि गुजरातचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आशिष भाटिया आणि इतर उच्च अधिकारीही उपस्थित होते.

गुजरातमधील मोरबी पूलावर 30 ऑक्टोबर रोजी अपघात झाल्यानंतर पंतप्रधानांनी अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत जाहीर केली होती.

त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करुन माहिती देण्यात आली की, मोरबी येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. अपघातानंतर लगेचच त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यापूर्वी मोरबी दुर्घटनेतील जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयाची रंगरंगोठी करण्यात आली होती.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version