Site icon Kokandarshan

ओंकार कलामंचाकडून राष्ट्रीय एकोपा जपण्यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद

हेमंत निकमःजल्लोष रामलल्लाचा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर आयोजित स्पर्धाचे बक्षीस वितरण

सावंतवाडी,दि.२८: अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर युवाईला प्रेरीत करणारे कार्यक्रम आयोजित करुन सावंतवाडीच्या ओंकार कलामंचाने राष्ट्रीय एकोपा जपण्याचा प्रयत्न केला त्यांचे हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज येथे व्यक्त केले.
दरम्यान विविध स्पर्धाच्या माध्यमातून मोबाईलच्या आहारी गेलेली तरुण पिढी आता पुढे येणे गरजेचे आहे त्यासाठी समाजात काम करणार्‍या विविध संस्था संघटनांनी आता अशा प्रकारचे उपक्रम घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले
ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित जल्लोष रामलल्लाचा या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर आयोजित रिल्स वेशभुषा आणी रांगोळी स्पर्धेचे उदघाटन आज येथिल महालक्ष्मी तथास्तू मॉल मध्ये घेण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निकम बोलत होते यावेळी आंतरराष्ट्रीय नेमबाजीचे प्रशिक्षक अ‍ॅड विक्रम भांगले,सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे,बांधकाम व्यावसायिक दादा नगनुर,मॉलचे संचालक कांता कोंडल्याळ,विनायक कोंडल्याळ,ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर,पदाधिकारी हेमंत पांगम,सचिन मोरजकर,चैतन्य सावंत,शुभम सावंत,भुवन नाईक,नितेश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी श्री साळुुंखे म्हणाले या ठीकाणी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे नवोदीत मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहणे काळाची गरज आहे
यावेळी श्री भांगले यांनी उपस्थित स्पर्धक व विद्यार्थ्यान शुभेच्छा दिल्या अशा प्रकारच्या विविध स्पर्धात भाग घेवून विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे त्यांनी सांगितले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version