ओरोस,दि.२८: महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार होऊन त्यात लोकसहभाग वाढावा या उद्देशाने बनविण्यात आलेल्या जलरथाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या हस्ते ओरोस येथे बुधवारी पार पडला.
यावेळी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सोनवणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे जिल्हा कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर जिल्हा प्रकल्प समन्वयक नितीन सावंत सहाय्यक प्रकल्प समन्वयक सीया गावडे सहाय्यक प्रकल्प समन्वयक राजवैध तालुका समन्वयक साक्षी कोरगावकर दिनेश गोवेकर संदिप साटम आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, जल जीवन मिशन यासारख्या योजना गावस्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शासनाच्या वतीने कौटिल्य मल्टिक्रियेशन, पुणे व बि.जि.एस. पुणे याच्या सोबत झालेल्या करारानुसार या योजना आता राबविण्यात येत आहेत.
या योजना गावस्तरावर पोचाव्यात यासाठी जलरथ ही तयार करण्यात आला असून या जलरथ च्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे.हा जलरथ गावस्तरावर जाणार असून या योजनाचे महत्त्व पटवून देणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजनांचा जलरथ च्या माध्यमातून प्रचार ओरोस येथे शुभारंभ: जलयुक्त शिवार गाळयुक्त धरणाचा समावेश

