सावंतवाडी,दि.२७: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी २७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर जन्म दिवसानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी मान्यवरासाठी स्वागत नृत्य गीत सादर करून पुस्तक पालखी दिंडी मध्ये साहित्य ग्रंथ प्रदर्शन मांडणी प्रमुख मान्यवराच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी मराठी भाषे बद्दल कविता ,भाषण , अभंग, गझल, भारूड वेशभूषा द्वारे मराठी भाषाचा अभिमान व्यक्त केला . या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. पी. मानकर प्रमुख वक्ते श्री. डी. जी. वरक प्राथमिक शिक्षक / राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण (मराठी सेट ) त्यांनी मराठी भाषा जतन व संवर्धन करण्यासाठी आजच्या तरुण पिढीनी साहित्याचे भरपूर वाचन केले पाहिजे असा संदेश दिला . तसेच प्राध्यापिका श्रीमती . सोनाली परब यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेवून आपली मातृभाषा जतन केली पाहिजे . या कार्यक्रमाचे सूंत्रसचालन कुमारी चिन्मयी सोमस्कर व कुमारी सिमरन डोईफोई हिने केले तसेच या कार्यक्रमाला श्रीमती आलेखा नाईल इयत्ता – अकरावी बारावी (कला वाणिज्य ) सर्व विद्यार्थी कॉलेज प्रमुख प्रा . श्री उत्तम पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री प्रसाद कोलगांवकर यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना आज आयोजित केलेला कार्यक्रम हा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी असून प्रत्येकाने आपल्या भाषेचा अभिमान अबाधित ठेवला पाहिजे असे नमूद केले. प्रशालेत मध्ये मराठी पुस्तक पालखी दिंडी व मराठी भाषेचा गौरव हा जयघोष करत विद्यार्थी समवेत प्रभात फेरी काढली.यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून उपस्थित होते.