Site icon Kokandarshan

लायन्स क्लब चिपळूण युनिटी चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

चिपळूण,दि.२४: २० फेब्रुवारी रोजी नव्याने सुरु झालेल्या लायन्स क्लब चिपळूण युनिटी चा पदग्रहण व शपथविधी समारंभ प्रांतपाल PMJF ला भोजराज जी नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लायन्स हॉल खेर्डी येथे उत्साहात संपन्न झाला.
क्लब मधील २३ सदस्यांना शपथप्रदान करण्यात आली. तसेच नवीन कमिटी चा शपथविधी संपन्न झाला. लायनेस प्रांतीय अध्यक्षा म्हणून अतिशय यशस्वी कारकीर्द असलेल्या MJF ला प्रांजल गुंजोटे यांना क्लब च्या संस्थापक अध्यक्षपदाचा मान देण्यात आला असून, सेक्रेटरी पदी ला एकता मुळ्ये, खजिनदार म्हणून ला श्रुती सावर्डेकर यांची नियुक्ती सर्व मतांनी करण्यात आली आहे. क्लब मध्ये ला तेजल पेढांबकर, ला तमिज मुल्ला या जुन्या सदस्यांसोबत नवीन वीस सदस्याची सहभाग आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यातून चिपळूण तसेंच मुख्यत्वे चिपळूण च्या आजूबाजूच्या परिसरात कार्य करण्याचा मानस नूतन अध्यक्षा MJF ला प्रांजल गुंजोटे यांनी मनोगतात व्यक्त केला. यावेळी लायन्स क्लब चिपळूण व लायन्स क्लब चिपळूण युनिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version