Site icon Kokandarshan

प्रा. रूपेश पाटील उद्या गोव्यात करणार शिव विचारांचा जागर.!

गोव्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.

सावंतवाडी,दि.२४: येथील सुप्रसिद्ध शिवशंभु व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांचे उद्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी बायणा – वास्को (गोवा) येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात शिवजन्मोत्सवानिमित्त ‘चला छत्रपती शिवरायांना समजून घेऊ..!’ या विषयावर दणदणीत व्याख्यान होणार आहे.

गोवा क्षत्रिय मराठा समाज मोरगाव शाखा वास्को – गोवा आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा उद्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक चार वाजून तीस मिनिटांनी रवींद्र भवन मिनी सभागृह बायणा – वास्को (गोवा) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मोरगाव मतदार संघाचे आमदार संकल्प पद्मनाभ आमोणकर असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे तसेच बेतकी खांडोळा जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले उपस्थित राहणार असून प्रा. रुपेश पाटील प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा छत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष पद्मनाभ हरी आमोणकर असणार आहेत. गोवा क्षेत्रीय समाजाचे केंद्रिय समिती सदस्य जयकुमार केळुसकर यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे मुरगाव शाखाध्यक्ष प्रा. सुनील शेट, महिला विभाग अध्यक्ष सौ. अक्षदा पाडेकर, सरचिटणीस शांताराम पराडकर, महिला सरचिटणीस वैशाली अमोणकर, खजिनदार युवराज आमोणकर, महिला खजिनदार सुनीता फडके यांनी केले आहे.

Exit mobile version