Site icon Kokandarshan

शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते तलावाच्या कठड्याच्या कामाचा शुभारंभ

सावंतवाडी,दि.२५ : येथील गेले कित्येक दिवस चर्चेत असलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाचा अखेर आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेविका दिपाली सावंत, माजी नगरसेविका माधुरी वाडकर, तानाजी वाडकर, अभिजीत मेस्त्री आदी शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान हे काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रयत्न केले होते.
यामध्ये विशेषतः माजी नगराध्यक्ष बबन सागावकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यानच्या काळात येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात आली होती. परंतु चुकीच्या पद्धतीने कठड्याच्या बाजूने गाळ उपसा झाल्यामुळे “तो” कोसळला होता. आज मंत्री केसरकर यांच्या हस्ते या तलावाच्या कठड्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याने येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version