मालवण,दि.१९: आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. हृदयनाथ गावडे यांचे ‘जिजाऊ पुत्र शिवराय’ या विषयावर व्याख्यान झाले. वेदांत वेंगुर्लेकर याने शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी पंकज गावडे व योगेश येरम यांना दुर्ग मावळारत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सैनिक चंद्रशेखर जोशी, खरारे पेंडूर ग्रामपंचायत सदस्य संदिप सावंत, हेमांगी जोशी, संगम चव्हाण, अमित पाडावे, हृदयनाथ गावडे, प्रसाद सुतार, किरण सावंत, अनिकेत गावडे, साईश गावडे, कविश गावडे, सानवी गावडे, दुर्गेश गावडे, प्रसाद पेंडूरकर, रोहन राऊळ, संकेत परब, अक्षय कविटकर, उत्कर्षा वेंगुर्लेकर, वेदांत वेंगुर्लेकर, योगेश येरम, साईप्रसाद मसगे, लक्ष्मण फोफळे, गणेश नाईक, सुमित पेंडूरकर आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची सोय दिप्ती दशरथ बोभाटे, गणेश नाईक, उत्कर्षा वेंगुर्लेकर व संदिप सावंत यांनी केली. उपस्थितीतांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.