Site icon Kokandarshan

खासदार विनायक राऊत यांनी नवनिर्वाचित सरपंचांची भेट घेऊन भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी,दि.24 : भोमवाडी येथील नवनिर्वाचित सरपंच सौ. अनुराधा वराडकर यांची खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान गावच्या विकासासाठी शिवसेनेकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले.

यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जि प सदस्य राजन मुळीक, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, सुनील प्रभुआजगावकर शेखर प्रभुआजगावकर, श्रीपाद वेंगुर्लेकर, उमेश बाळे, दीपक बाळे, आलेलीय फर्नाडिस,सुनील खोत, झीलु खोत, सफल प्रभु आजगावकर,गोपाळ मसुरकर, राजन फेंद्रे, सदस्य रश्मी राजन फेंद्रे, मधु वराडकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version