Site icon Kokandarshan

सावंतवाडीत १७ ते १९ ला दरम्यान ऐतिहासिक नाट्य महोत्सव…

राजन पोकळेंची माहिती; शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार शिवजागर…

सावंतवाडी,दि.१५: दीपक केसरकर मित्रमंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार यांच्या माध्यमातून सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे नेते राजन पोकळे यांनी दिली. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू आणि नरसिंह शिवराय ही तीन ऐतिहासिक नाटके सादर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मातृभूमी शिक्षण संस्थेच्या प्रमुख डॉ. सोनल लेले, कलाकार मिलिंद कासार, भरत गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पोकळे म्हणाले, शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या नाट्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ता. १७ ते १९ या कालावधीत पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात होणार आहे. यात १७ तारखेला रात्री ८ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर “रायगडाला जेव्हा जाग येते” हा नाट्य प्रयोग होणार आहे. त्यानंतर १८ तारखेला रात्री ८ वाजता “इथे ओशाळला मृत्यू” हे नाट्य सादर करण्या येणार आहे. तर १९ तारखेला “शिवपूजन व सांगता सोहळा” होणार आहे. त्यानंतर “नरसिंह शिवराय” हे नाट्य सादर करण्यात येणार आहे. या महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त शिवप्रेमींनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन शिवसंस्कारच्या प्रमुख डॉ. सोेनल लेले यांनी केले आहे.

Exit mobile version